चित्रपटांच्या 120 कोटी कमाईचे वक्तव्य रवीशंकर प्रसाद यांनी घेतले मागे, व्यक्त केला खेद

473

दोन ऑक्टोबर रोजी तीन हिंदी चित्रपटांनी 120 कोटी रुपयांची कमाई केली म्हणून मंदी नाही असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केले होते. त्यावर चौफेर टीका झाल्यानंतर प्रसाद यांनी आपले वक्तव्य मागे घेत खेद व्यक्त केला आहे.

सांख्यिकी मंत्रालयाचा आर्थिक मंदीवर एक अहवाल होता. हा अहवाल खोटा असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले होते. आम्ही सरकारी नोकरी देऊ असे कुठेच म्हटले नव्हते असे प्रसाद म्हणाले. काहींनी ठरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे असेही प्रसाद यावेळी म्हणाले.

प्रसाद जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा म्हणाले की दोन ऑक्टोबर रोजी तीन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले होते. जर मंदी नसती तर त्यांनी 120 कोटी रुपये कमावले नसते. मला चित्रपट आवडतात चित्रपट उद्योग हा मोठा व्यवसाय आहे.

हे शब्द मागे घेत प्रसाद म्हणाले की “120 कोटींचे जे वक्त्तव्य मी मुंबईत केले होते त्यात तथ्य होते. मुंबई ही चित्रपट उद्योगांची राजधानी आहे. या उद्योगामुळे लाखो लोकांना रोजगार मिळतो. माझे संपूर्ण वक्तव्य सोशल मीडियावर उपलब्ध आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. तरी मी माझे वक्तव्य मागे घेतो कारण मी संवेदनशील व्यक्ती आहे.” असे सांगून प्रसाद यांनी खेद व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या