आता कानाने अनलॉक करा मोबाईल

267

गेल्या काही वर्षांत स्मार्टफोनचे ऑथेंटिकेशन प्रोसेस पूर्ण बदलले आहे. सुरुवातीला स्मार्टफोन अनलॉक करण्यासाठी पासवर्ड, पिन वापरले जायचे. त्यानंतर फिंगरप्रिंट स्कॅनिंग आणि फेशिअल रेकग्निशन तंत्र आले. त्याहीपुढे जात आता कानाच्या मदतीने स्मार्टफोन अनलॉक करण्यावर संशोधन झाले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ बफलो येथील कम्प्युटर सायन्स आणि इंजिनियर विभागाचे असोसिएट प्रोफेसर जानपेंग जिन यांच्या टीमने इयरएको तंत्र लाँच केले आहे. हे बायोमेट्रीक टुल असून त्याद्वारे कानाचा आतील भाग स्कॅन करून वायरलेस इयरबर्ड्सच्या मदतीने मोबाईलधारकाचे ऑथेंटिकेशन करण्यात येईल. याबाबतचे संशोधन कम्प्युटर मशिनरी असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. प्रोटोटाईप बनवण्यासाठी संशोधकांनी मॉडिफाईड इन इयर इयरफोन्स आणि छोटय़ा माईकचा वापर केला. कानात ध्वनी आला, तर तो पसरतो, परावर्तित होतो आणि इयर कनालद्वारे शोषून घेतला जातो. याला इयरएको सिद्धांत म्हणतात. या प्रक्रियेत ऑडियो सिग्नेचर तयार होतात, ते मायक्रोफोनमध्ये रेकॉर्ड होऊ शकतात. त्यांच्या मदतीने फोन अनलॉक होऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या