नरेंद्र मोदी व अमित शहा यांना भेटायचे होते पण ते भेटले नाहीत, उन्नाव बलात्कार पीडितेने व्यक्त केली खंत

” पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना मी मला भेटायचे आहे असे आवाहन केले होते. मात्र ते मला भेटले नाहीत”, अशी खंत उन्नाव बलात्कार पीडितेने व्यक्त केली आहे. पीडितेने राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ही खंत व्यक्त केली.

”मी पंतप्रधान, गृहमंत्री, केंद्रीय मंत्री सर्वांना भेटण्यासाठी आवाहन केलं होतं. मात्र कुणीही मला भेटले नाहीत. राहुल गांधी यांनी स्वत:हून मला फोन केला आणि भेटायला बोलावले. मी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांनी मला न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. राहुल गांधी माझ्या या लढाईत माझ्य़ा सोबत आहेत”, असे उन्नाव बलात्कार पीडितेने प्रसारमाध्यमांना सांगितले.