डिलिव्हरी बॉयसोबत अश्लील कृत्य

दारू पिण्याचा बहाणा करून डिलिव्हरी बॉयसोबत सुरक्षा रक्षकाने अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सुरक्षा रक्षकाला खार पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार तरुण हा डिलिव्हरी बॉयचे काम करतो. शुक्रवारी रात्री तो ऑर्डर घेऊन खार परिसरात आला. तेव्हा त्याला एका अनोळखी व्यक्तीची मोटरसायकल बंद पडल्याचे दिसले. त्यामुळे त्याला मदत करण्यासाठी तो गेला. धक्का मारत तो खार 14वा रस्ता परिसरात आला. त्यानंतर त्याने तक्रारदार याला दारूची ऑफर केली. होकार दिल्यावर तक्रारदार तरुण हा एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये दारू पिण्यासाठी गेला. दारू पीत असताना सुरक्षा रक्षकाने त्याच्यासोबत अश्लील अनैसर्गिक कृत्य करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याने प्रतिकार केला. त्याने त्याची कशीबशी स्वतःची सुटका केली. सुटका केल्यानंतर त्याने याची माहिती त्याच्या भावाला दिली.