आत्महत्येपूर्वी तरुणाने देवाच्या नावाने लिहली सुसाईड नोट

149
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन। आग्रा

उत्तर प्रदेशातील आग्रा मधील अछनेरा येथील रायभा गावात प्रेयसी सोडून गेल्याने निराश झालेल्या एका 22 वर्षीय तरुणाने शनिवारी मंदिरातील घंटेला गळफास लावून आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. पण आत्महत्येपूर्वी त्याने चार सुसाईड नोट लिहल्या. यातील एक चिट्ठी त्याने देवाच्या नावाने लिहली आहे. यात त्याने देवाची माफी मागितली असून आपल्यानंतर आई वडिलांची काळजी घेण्यास सांगितले आहे. सकाळी मंदिरात महिला पूजा करण्यास आल्या. तेव्हा घंटेला मृतावस्थेत लटकलेला तरुण त्यांना दिसला. श्याम सिकरवार असे त्याचे नाव आहे.

श्याम जयपूर येथे तंदूरी भट्टीत कामाला होता. त्याचे एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. पण काही महिन्यापू्र्वी गुडगाव येथे एका फॅक्टरीत नोकरी मिळाल्याने त्याने जयपूर सोडले. यामुळे त्याची प्रेयसी त्याच्यावर रागावली दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. अखेर तरुणीने त्याच्याशी संबंध तोडून टाकले. पण श्यामचे तिच्यावर खूप प्रेम होते. त्यामुळे त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती ठाम होती. प्रेयसी सोडून गेल्याने तो निराश झाला होता. नव्या नोकरीत त्याचे मन रमेनासे झाले. शेवटी त्याने नोकरी सोडली व तो पुन्हा गावी जयपूरला परतला. आल्यावर त्याने प्रेयसीला भेटण्याचा प्रयत्नही केला. पण तिने त्यास नकार दिला. यामुळे अधिकच दुखावलेल्या श्यामने मित्रांना तो लवकरच नसणार असे संकेतही दिले. त्यानंतर मंदिरात जाऊन त्याने चार चिट्ठया लिहल्या. भाऊ, मित्र, देव, ज्यांच्याकडून कर्ज घेतले होते अशा व्यक्तींच्या नावेही त्याने एक चिठ्ठी लिहली.

यातील एक नोट त्याने भावांसाठी लिहली होती. त्यात त्याने आईची नीट काळजी घ्या. मी केलेल्या कृत्यसाठी मला माफ करा. आईची काळजी घ्याल असे वचन द्या. तिच्या डोळ्यात कधीही अश्रू येणार नाहीत एवढी तिची काळजी घेण्याची कळकळीची विनंती त्याने भावांना केली होती.

तर दुसरी नोट देवाच्या नावाने लिहली होती. या पवित्र जागेपेक्षा दुसरे कोणतेही पवित्र स्थळ नाही. यामुळे याच ठिकाणी आपण आयुष्याचा शेवट करत आहोत. तरी आपल्या आई वडिलांची काळजी घेण्याची विनंती रमकेशने या सुसाईड नोटमधून देवाला केली होती.

तसेच तिसऱ्या चिठ्ठीत त्याने ज्यांच्याकडून कर्ज घेतले आहेत. त्यांना आपला मोबाईल विकून पैसे द्यावे असे सूचित केले आहेत. तर चौथ्या चिठठीत आपल्या मृत्यूनंतर आपले अवयवदान करण्यात यावे अशी विनंती घरच्यांना केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या