दोन हजार फूट उंचीवर अचानक झाला बिघाड, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मौर्या यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांच्या हेलिकॉप्टरचे आज आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टर हवेत असतानाच अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. मात्र तोपर्यंत उपमुख्यमंत्र्यांसह सहा जणांचे जीव टांगणीला होते.

केशव मौर्य हे लखनऊ येथून कौशांबी येथे जाण्यासाठी सकाळी 10.45 वाजता हेलिकॉप्टरने रवाना झाले, मात्र उड्डाण घेतल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने हेलिकॉप्टरचा डिस्प्ले अचानक बंद झाला आणि आत धूर भरायला लागला. वैमानिकाने तत्काळ लखनऊ एटीसीला सूचना देऊन आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितील. परवानगी मिळताच वैमानिकाने हेलिकॉप्टर लखनऊच्या दिशेने माघारी फिरवले.