
सामना ऑनलाईन । लखनौ
बनारस हिंदू विश्वविद्यालय रुग्णालय परिसरातातील एका दृश्याने गुरुवारी संपूर्ण वाराणसी हादरली. रुग्णालय परिसरात काळ्या रंगाचा एक मोकाट कुत्रा तोंडात नवजात बालकाचे मुंडके घेऊन फिरत होता. हे बघून तिथे उपस्थित असलेल्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यानंतर रुग्णालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. यामुळे कुत्र्याने बालकाचे मुंडके तिथेच टाकून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी ते मुंडके ताब्यात घेतले.

हे मुंडके पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून आजूबाजूच्या परिसरात बालकाचे धड आहे का याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच बेपत्ता बालकांच्या तक्रारींचीही तपासणी करण्यात येत आहे. यातूनच या मुंडक्यामागचे गूढ उलगडेल असे पोलिसांनी सांगितले आहे.



























































