सेक्सनंतर मुमताजने गर्लफ्रेंडला 18 व्या मजल्यावरून फेकले; महिलेचा मृत्यू, आरोपी अटकेत

7656

उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथे शारीरिक संबंधांनंतर एका माथेफिरु प्रियकराने प्रेयसीला इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून खाली फेकल्याची भयंकर घटना घडली आहे. आरोपीने प्रेयसीला त्याच्या फ्लॅटवर बोलावले होते. पण त्यांच्यात वाद झाला. यामुळे रागाच्या भरात आपण तिला खाली फेकल्याची कबुली आरोपीने दिली आहे. मुमताज असे आरोपीचे नाव आहे. तर गरिमा देवी गौतम असे त्याच्या प्रेयसीचे नाव आहेत.

मुमताज हा विवाहित असून पत्नीबरोबर त्याचे पटत नव्हते. यामुळे रोज रोजच्या वादाला कंटाळून त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. याचदरम्यान मुमताजचे त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या गरिमा देवी गौतम या महिलेवर प्रेम जडले. ते रोज भेटू लागले. जास्तीत जास्त वेळ एकमेकांना देऊ लागले. 2 नोव्हेंबरला रात्री मुमताजने प्रेयसीला त्याच्या घराऐवजी हाईट्स या इमारतीत बोलावले. गरिमा त्याच्या घरी आली. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंधही झाले. पण त्यानंतर थोड्याच वेळात दोघांमध्ये वाद झाला. यावेळी रागात गरिमाने मुमताजला त्याच्या पत्नीला त्यांच्या अनैतिक संबंधाबद्दल सांगण्याची धमकी दिली.

हे ऐकताच मुमताजची सटकली त्याने रागात किचननधून लाटणं आणलं आणि गरिमाच्या डोक्यात घातलं. लाटण्याचा मार जिव्हारी लागल्याने गरिमा बेशुद्ध झाली. पण अतिरक्तस्रावामुळे काही तासांतच तिचा मृत्यू झाला. हे बघताच घाबरलेला मुमताज इमारतीच्या खाली येऊन बसला. दोन तीन तासांनी तो परत घरी गेला. त्यानंतर त्याने गरिमाचा मृतदेह बेडमध्ये ठेवला व तो समोरच राहणाऱ्या भावाच्या घरी निघून गेला. गरिमाने आत्महत्या केली आहे असे दिसावे म्हणून मुमताजने दुसऱ्या दिवशी पहाटे तिचा मृतदेह बेडमधून बाहेर काढला व 18 व्या मजल्यावरून तो खाली फेकला.  मृतदेह बघून सुरक्षा रक्षकांनी व स्थानिकांनी एकच गोंधळ घातला. याचा फायदा घेत मुमताज तिथून सटकला. त्यानंतर त्याने थेट आपले गाव बिहार गाठले. मात्र पोलिसांपासून तो फार काळ वाचू शकला नाही, त्याला गावातूनच अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या