ठांय ठांय नंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी केले तुगडूक तुगडूक

1165

गोळ्या संपल्या म्हणून गुंडांना घाबरवण्यासाठी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी तोंडातून ठांय ठांय असा आवाज काढला होता. आता मॉक ड्रील दरम्यान घोडे नव्हते म्हणून पोलिसांनी तुगडूक तुगडूक करत सराव केला आहे. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेश गर्दी व्यवस्थापनाचे मॉक ड्रील करत होते. तेव्हा त्यांच्याकडे घोडे नव्हते. तेव्हा पोलिसांनी आपल्या कर्मचार्‍यांना काठी ही घोडा असल्याचे सांगून सराव करण्यास सांगितला. तेव्हा पोलीस कर्मचारी तसेच काठी घेऊन जमावाच्या दिशेने धावत होते. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ 8 नोव्हेंबरचा आहे. अयोध्या प्रकरणाचा निकाल येणार होता. त्यामुळे गर्दी व्यवस्थापनाचा एक मॉक ड्रील पोलीस प्रशासन करत होते. फीरोझाबादमधला हा व्हिडीओ असून समाजवादी नेते विकास यादव यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

उत्तर प्रदेशचा हा प्रताप नवा नाही. काही महिन्यांपूर्वी एका एन्काऊंटरदम्यान पोलिसांच्या गोळ्या संपल्या. गुन्हेगारांना घाबरवण्यासाठी त्यांनी तोंडातून गोळ्यांच ठांय ठांय असा आवाज काढला होता.

आपली प्रतिक्रिया द्या