
संरक्षक जाळय़ांवर मारल्या उडय़ा, पोलिसांची एकच धावपळ
अमरावतीतल्या अपर वर्धा धरणग्रस्तांनी आज मंत्रालयात गनिमीकाव्याने प्रवेश केला आणि मंत्रालयात दुसऱया मजल्यावर लावण्यात आलेल्या संरक्षक जाळय़ांवर उडय़ा मारल्या. हातातील पत्रके इतस्ततः फेकली. वास्तविक, आंदोलकांनी पत्रक जारी करून मंत्रालयात आंदोलन पुकारण्याची घोषणा केली होती; पण पोलिसांना बेसावध ठेवत एकेका आंदोलकाने मंत्रालयात प्रवेश केला आणि जाळय़ांवर उडय़ा मारल्या. अनपेक्षितपणे झालेल्या या प्रकारामुळे पोलीसही काही क्षणासाठी गांगरून गेले होते.
मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत सकाळपासून एक मेडिकल पँप सुरू होता. त्यामुळे गर्दी होती. दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी अचानक दुसऱया मजल्यावर घोषणाबाजी सुरू झाली. या जाळीवर चार आंदोलनकर्त्यांनी उडय़ा मारल्या. हातातील पत्रके भिरकावत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अपर वर्धा प्रकल्पासाठी आमच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. आम्ही अनेक दिवसांपासून निवेदने देत आहोत. मात्र आमच्या मागण्यांकडे कोणीही लक्ष दिले नाही. आज मंत्रालयात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघेही उपस्थित असल्याने आम्ही हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. जाळीवर उडी मारलेल्या चार जणांपैकी एक आंदोलक प्रल्हाद टाकळे याला यावेळी अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याला उपचारासाठी जीटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र नंतर त्याची प्रकृती चांगली झाल्याचे पोलिसांनी सांगितले. चारच जणांनी जरी जाळय़ांवर उडी मारली असली तरी एकूण चाळीसच्या आसपास आंदोलनकर्त्यांची संख्या होती. या सगळय़ांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
दरम्यान, आंदोलनकर्त्या शेतकऱयांशी चर्चा झाली आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून लवकरच याविषयी बैठक घेण्यात येईल आणि शेतकऱयांना न्याय देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
शासन नेमपं कुणाच्या दारी?
‘शासन आपल्या दारी’ म्हणणाऱया सरकारला शेतकऱयांनी मंत्रालयात येऊन आरसा दाखवला. अमरावती येथील धरणग्रस्त शेतकरी गेले 103 दिवस आंदोलन करत होते. पह्डापह्डीच्या राजकारणात व्यस्त असलेले सरकार आणि ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या जाहिरातबाजीच्या ओझ्याखाली दबलेल्या प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी मंत्रालयात जीव धोक्यात घालून आंदोलन केले. राज्याला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असूनही ही वेळ आली आहे, असे टिव्ट करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्ला चढवला.


























































