आमदाराने जमीन बळकावल्याचा आरोप करत वृद्धाचे उपोषण, दहा वर्षापासून देतायत लढा

1001

आपल्या मालकीच्या जमिनीचे फेरफार व सातबारा उतारे मिळावेत म्हणून शासन दरबारी दहा वर्षे फेऱ्या मारून थकलेले राजाराम टावरे हे प्रजासत्ताक दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून अद्याप प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही. दरम्यान शुक्रवारी त्यांची प्रकृती खालावाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उरणचे भाजपा आमदार आमदार महेश बालदी, तनसुखलाल पन्हालाल जैन, शिवलिंग वरदाजी खरवड, सुरतसिंग चंपाजी दसाना, विकी हस्तीमल मेहता यांनी टावरे यांच्या जमिनींचा गैरव्यवहार करुन त्यांची मोठी फसवूणक केली आहे . या जमिनींचा शेतसारा टावरे कुटुंबीयांकडून स्वीकारण्यास तलाठी नकार देत असे राजाराम टावरे सांगितले आहे.

मी, माझ्या मुली सुनिता, सुजाता, बहिण शांताबाई लक्ष्मण पाटील, चुलत भाऊ निकेश भरत टावरे, असे एकत्रित कुटूंब जागेचे मालक असून माझ्या वडिलांची आजी कै. वारीबाई गणा घरत जांभुळपाडा, ता. उरण येथे राहत होती. त्यांच्या नावावर मौजे वेश्‍वी, चिर्ले, बेलोंडे खार आदी ठिकाणच्या जमिनी आहेत. त्या मयत झाल्यानंतर या शेतजमिनींची मालकी वारसाहक्काने राजाराम टावरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यानुसार या जमिनींचा शेतसाराही ते संबंधित तलाठी सजामध्ये भरत होते. मात्र वारीबाई घरत यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या खाते पुस्तकातील खाते नंबर असणार्‍या बहुतेक जमिनी या वारसा हक्काने मिळाल्या संबंधातील जमिनीचा फेरफार व सातबारा देखील होता. मात्र आमदार महेश बालदी, तनसुखलाल पन्हालाल जैन, शिवलिंग वरदाजी खरवड, सुरतसिंग चंपाजी दसाना, विकी हस्तीमल मेहता यांनी या जमिनीच्या फेरफार व सातबारा मध्ये स्थानिक माणसांचा गैरमालक म्हणून वापर करुन बेकायदेशीर सर्व जमिनींचा गैरव्यवहार करुन मोठी फसवूणक केली असा आरोप टावरे यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या