उर्दू कॅलिग्राफीतून साकारला अक्षरगणेश; दहावीतील तानयाची अनोखी कलाकृती

467

विघ्नहर्ता गणरायाची अनेक नावं, अनेक रुपं आहेत. कलेच्या देवताच्या या नानाविध रुपांची कलावंतांना भुरळ पडली नाही तर नवल…. यातून कुणी गणरायाची मूर्ती तयार साकारतं, तर कुणी अक्षरगणेश… दहावीत शिकणाऱया तानया इम्तियाज या मुलीने तर उर्दू कॅलिग्राफीतून गणराय साकारले आहेत. गणरायाच्या 57 नावांचा वापर करून तिने ही अनोखी कलाकृती साकारली आहे.

तानया सय्यद छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील यंग लेडी स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकते. तिचे वडील सय्यद इम्तियाज हुसैन हे शाखा क्रमांक 223 चे उपशाखाप्रमुख आहेत. ’हम मुंबईकर’ ही त्यांची एनजीओ आहे. सय्यद इम्तियाज हे व्यवसायाने इंटिरियर डेकोरेटर आहेत. तसेच दादर येथे त्यांचे बेकरी शॉप आहे. त्यांच्याच प्रेरणेने तानया हिने उर्दू कॅलिग्राफीतून श्रीगणरायाचे चित्र काढले आहे. याबद्दल अधिक माहिती देताना सय्यद इम्तियाज म्हणाले, भगवान गणेशाची 108 नावं आहेत. तानयाने 57 नावं घेऊन पेन्सिल स्केच काढलं. तसेच कॉफीचा वापर करून रंग तयार केला आहे.

उर्दूच्या प्रसारासाठी…

सध्या काही भाषा संकटात आहे. उर्दू शाळा बंद होत आहेत. अशा स्थितीत उर्दू भाषेकडे सरकारने लक्ष द्यावे. तसेच या भाषेचा प्रसार व्हावा, या उद्देशाने उर्दूचं सौंदर्य श्रीगणरायाच्या कलाकृतीतून सर्वांसमोर आणण्याचा छोटासा प्रयत्न तानया इम्तियाज या मुलीने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या