उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. उर्मिला यांनी स्वत: ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी घरातच स्वत:ला क्वारंटाईन केलेले आहे.

‘माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत ठिक असून मी स्वत:ला घरातच क्वारंटाईन केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करून घ्यावी ही माझी विनंती. तसेच लोकांनी या दिवाळीच्या सणामध्ये आपल्या निकटवर्तीयांची काळजी घ्यावी अशी मी कळकळीची विनंती सर्वांना करत आहे’, असे ट्विट उर्मिला यांनी शेअर केले आहे.