डॉक्टरांनी आधी घेतला रुग्णाचा प्राण, उपचारानंतर केले परत जिवंत

2350

जर तुम्ही अपघातात गंभीर जखमी असाल किंवा तुम्हांला हृदयविकाराचा झटका आला आहे. तर चिंता करू नका. मरणाला तर मुळीच घाबरू नका. कारण आता तुम्ही मरणानंतरही पुन्हा जिवंत होऊ शकणार आहात. असा दावा अमेरिकेतील डॉक्टरांनी केला आहे. दहा लोकांवर याचा प्रयोग करण्यात आला. त्यात मृत व्यक्तीला जिवंत करता येणे शक्य असल्याचे शास्त्रज्ञांना आढळले. यास इमरजेंसी प्रिजरवेशन एंड रिससिटेशन (EPR) असे बोलले जाते.

अमेरिकेतील बाल्टीमोर शहरातील युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड स्कूल ऑफ मेडिसीन सेंटरच्या संशोधकांनी हा चमत्कार घडवला आहे. याबद्दलचा अहवाल न्यू सायंटिस्ट मॅगझीनमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड स्कूल ऑफ मेडिसीन सेंटरच्या डॉक्टर सॅम्युअल टिशरमेन आणि त्यांच्या टीमने हा अविश्वसनीय कारनामा करून वैद्यकीय विश्वात खळबळ उडवली आहे. बऱ्याचवेळी अनेक गंभीर रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी आणले जाते. पण त्यांच्यावर आवश्यक शस्त्रक्रिया पूर्ण होण्याच्या आतच अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू होतो. यामुळे रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना वेळच मिळत नाही. यामुळे डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अयशस्वी होतात. म्हणून जर जखमी रुग्णाला आधीच मृतावस्थेत पाठवले आणि उपचारानंतर त्याला पुनर्जिवित करता आले तर. असा प्रश्न सॅम्युअल व त्यांच्या टीमला पडला होता. त्यातच एके रात्री एका गंभीर जखमी झालेल्या डुकराला वाचवण्यासाठी मारण्यात आले. पण उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा जिवित करण्यात डॉक्टरांना यश मिळाल्याचे डॉक्टर सॅम्युअल यांनी डोळ्यांनी बघितले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्याकडे मध्यरात्री एक तरुण आला होता. त्याच्या छातीवर कोणीतरी चाकूचा घाव केला होता. जखम मोठी होती. त्याच्यावर तात्काळ उपचाराची गरज होती. यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला. माज्ञ नंतर त्याला जिवंत करण्यात आले.

हे बघून सॅम्युअल यांना एक कल्पना सूचली व त्यांनी या पद्धतीचा अहवाल बनवला व वरिष्ठांना दाखवला. त्यात गंभीर व्यक्तींना 10 ते 15 डिग्री सेल्सियस तापमान असलेल्या खोलीत ठेवण्यात येते. त्यानंतर व्यक्तीच्या थंडगार पडलेल्या शरीरातून सलाईनद्वारे सर्व रक्त काढण्यात येते. त्यानंतर मेंदू काम करण्याचे बंद करतो. या अवस्थेत व्यक्तीला मृत घोषित करण्यात येते असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याआधी एका गंभीर जखमी डुकरावर असा प्रयोग करण्यात आल्याचे सॅम्युअल यांच्या निदर्शनास आले. त्यातूनच प्रेरणा घेत त्यांनी दहा रुग्णांवर असाच प्रयोग केला व तो यशस्वी झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या