
हिंदुस्थानातील निवडणुकीत मतदान वाढवण्यासाठी यूएसएड या अमेरिकी संस्थेने 21 मिलियन डॉलर्सचा (175 कोटी रुपये) निधी दिल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा चुकीचा निघाला आहे. अमेरिकी दूतावासानेच ट्रम्प यांना खोटे पाडले आहे.
2014 ते 2024 या कालावाधीत यूएसएड/इंडिया या संस्थेने हिंदुस्थानातील निवडणुकीत मतदान वाढवण्यासाठी निधी दिला होता, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्यावरून खळबळ उडाली होती. भाजप व काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. मात्र अमेरिकी दूतावासाने त्यावर खुलासा केला आहे. यूएसएड संस्थेला अशा कुठल्याही कामासाठी अनुदान मिळाले नव्हते आणि संस्थेनेही कुणालाही काही निधी दिला नव्हता. निवडणुकीशी संबंधित कुठल्याही कामात संस्थेचा सहभाग नव्हता, असे दूतावासाने हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाला कळवले आहे. अमेरिकी दूतावासाने दिलेली ही माहिती केंद्र सरकारने आज संसदेत दिली.
लार्सन अॅण्ड टुब्रो कामगार सहकारी पतपेढीची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. भारतीय कामगार सेना चिटणीस संदीप राऊत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी एल अॅण्ड टी व्यवस्थापनाकडून डिफेन्स हेड ए. टी. रामचंदानी, एच.आर. डिफेन्स संतोष, भारतीय कामगार सेना एल अॅण्ड टी युनिट अध्यक्ष यशवंत सावंत, जनरल सेव्रेटरी विनायक नलावडे, कार्याध्यक्ष अमोल शिळीमकर, उपाध्यक्ष कृष्णकांत कदम, खजिनदार प्रवीण मोरे यांच्यासह पतपेढीचे सर्व संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.