पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान; अमेरिकी सिनेटरने फटकारले

पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असून तो दहशतवाद्यांचे आश्रयस्थान आहे, हे हिंदुस्थानकडून जगाला सांगण्यात येत होते. याबाबतचे अनेक पुरावेही हिंदुस्थानने जगासमोर आणले होते. आता पाकिस्तानचे खरे स्वरुप जगाला समजत आहे. आता अमेरिकेनेच पाकिस्तानचा हा चेहरा जगासमोर आणला आहे.अफगाणिस्तानमध्ये तालीबानची पाळेमुळे रुजण्यास पाकिस्तानच जबाबदार असल्याचा दावा अमेरिकेचे सिनेटर आणि सिनेट आर्म्ड सर्व्हिस कमिटीचे अध्यक्ष जॅक रीड यांनी अमेरिकेच्या संसदेत केला आहे.

अफगाणिस्तानात पाकिस्तानची पाळेमुळे रुजण्यास पाकिस्तान जबाबदार आहे. तसेच पाकिस्तानातूनच तालिबानवर नियंत्रण ठेवण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पाकिस्तानकडून प्रोत्साहन, आर्थिक मदत आणि आश्रय मिळत असल्यानेच तालिबान मोठ्या प्रमाणात वाढल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे तालिबानचा बंदोबस्त करण्यात अमेरिकेला अपयश आल्याचे त्यांनी सांगितले.

अफगाणिस्तानातून 11 सप्टेंबरपर्यंत अमेरिकेच्या सैनिकांना माघारी बोलावण्याचे आदेश व्हाईट हाऊसकडून देण्यात आले आहेत. या आदेशानंतर जॅक रीड यांनी पाकिस्तानचे खरे रुप जगासमोर आणले आहे. दहशतवाद पसरण्यासाठी आश्रयदाते महत्त्वाचे असतात. पाकिस्तानने दहशतवादाविरोधात अमेरिकेला सहकार्य करत असल्याचे भासवत तालिबानलाच मदत केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

2018 पासूनचा घटनाक्रमाचा अभ्यास केल्यास पाकिस्तानने लष्करी आणि गुप्त माहितीसाठी मदत केली. त्याचा उपयोग झाला नाही. मात्र, त्यामुळे अमेरिकन सैनिक, अफगाणी सुरक्षा दलाचे जवान यांचा नाहक बळी गेल्याचेदिसून येते. त्यामुळे घटनाक्रमाचा अभ्यास केल्यास पाकिस्तानने अमेरिकेला सहकार्य केल्याचे भासवल्याचे स्पष्ट होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या