
अमेरिका आता इराणवर सर्वात मोठा हल्ला करण्याची तयारी करत आहे. या हल्ल्यासंबंधी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली आहे. हल्ल्याची तयारी पूर्ण झाली आहे. आता फक्त निर्णय घेणे बाकी आहे. इराणने अजून पुरेसे दुःख सोसले नाही असे ट्रम्प म्हणाले आहेत, तर ट्रम्प यांच्या विधानानंतर इराणने तत्काळ प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेने हल्ले सुरूच ठेवले तर त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी दिला आहे.


























































