
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव सतत वाढत असून युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडे शस्त्रांचा पुरेसा साठा नसूनही त्याच्या कुरापती काही थांबात नाहीएत. हिंदुस्थानसोबत सुरू असलेल्या या युद्धजन्य परिस्थितीदरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे सैन्य प्रमुख असीम मुनीर आणि हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन केले.
पाकिस्तानकडून सतत होणाऱ्या हल्ल्यांमध्ये असीम मुनीर, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि एस जयशंकर यांच्यात एक महत्त्वाची चर्चा झाली. हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तान सैन्याचे प्रमुख असीम मुनीर यांच्याशी स्वतंत्रपणे संपर्क साधून त्यांना सल्ले दिले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी तणाव कमी करण्याचे आणि थेट चर्चा करण्याचे आवाहन केले. तसेच पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणे थांबवावे, अशी सूचनाही केली.
संभाषणादरम्यान मार्को रुबियो यांनी पाकिस्तानच्या एनएसएशी चर्चा करून युद्ध थांबवून शांतता राखण्यास सांगितले. हिंदुस्थानच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा विचारही करू नका, असा इशाराही अमेरिकेने पाकिस्तानला दिला. त्याच वेळी, त्यांनी उघडपणे हिंदुस्थानचे समर्थन केले. पाकड्यांकडून सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे मार्कोस यांनी पाकिस्थानला वेळीच थांबवा, असे म्हणत गंभीर इशारा दिला.

























































