करोडो युजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅप नेहमी नवीन फीचर घेऊन येत असते. आताही व्हॉट्सअॅप एका अफलातून फीचरवर काम करत आहे. युजरनेम फीचर असे त्याचे नाव आहे. यामध्ये एखाद्याचा मोबाईल नंबर नसतानाही आपण त्याच्याशी व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करू शकणार आहोत.
खरं तर व्हॉट्सअॅप हे फोन नंबरवर चालणारे अॅप आहे, पण त्यात लवकरच युजरनेम वापरण्याची सुविधा येणार आहे. डब्ल्यूएबीटाइन्पह्च्या रिपोर्टनुसार, युजरनेमच्या आधारे एखाद्याचा नंबर नसतानाही त्याच्याशी चॅट करू शकता. सुरुवातीला ही सुविधा व्हॉट्सअॅप वेबसाठी उपलब्ध होणार आहे. त्याच्या लाँचिंगची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामप्रमाणे व्हॉट्सअॅपवरही युजरला स्वतःचे युजरनेम बनवता येईल. हे युजरनेम पूर्ण वेगळे असेल आणि ते तुमच्याच नावावर असेल. तुमच्या फोन नंबरशिवाय एखाद्या वेगळ्या ओळखीने तुम्ही इतरांशी चॅट करू शकाल. ज्यांच्याकडे तुमचा फोन नंबर आहे, असे युजर तुम्हाला पूर्वीप्रमाणेच शोधू शकतील. तुम्ही कुणाला संपर्क करू द्यायचा आणि कुणाला नाही, यावर तुमचे नियंत्रण असेल.