आज जियो फ़ायबर होणार लॉन्च, या सुविधा मिळणार मोफत

1456

आज पाच सप्टेंबरपासून जियो फायबर ही बहुप्रतिक्षित सेवा सुरू होणार आहे. रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत जियो फायबरबद्दल मुकेश अंबानीचे मुलं आकाश आणि ईशा अंबानीने माहिती दिली होती. जियो फायबरमधून ग्राहकांना सेट टॉप बॉक्स मिळणार आहे. तसेच या सेवेतून ग्राहकांना व्हिडीओ कॉन्फरन्सची सेवाही मिळणार आहे.

ग्राहकांसाठी तीन आकर्षक प्लान 

अवघ्या 700 रुपयात मिळणार या सेवा

अवघ्या 700 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल आणि 100 MBPS इंटरेनेट सेवा मिळणार आहे. तसेच एचडी चॅनलचाही या प्लानमध्ये समावेश आहे.

10 हजार रुपयांचा  प्लान 

10 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना तब्बल 1GBPS  इंटरनेट सेवा मिळणार आहे. यात जियो होम, जियो IOT सारख्या सेवांच्चा समावेश आहे. तसेच जो चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित होईल त्याच दिवशी पाहण्याची एक्सक्लुसिव सेवाही या प्लानमध्ये मिळणार आहे.

फॉरएवर/वेलकम प्लान

या प्लानमध्ये ग्राहकांना 4 के एल ईडी टीव्ही आणि 4 के सेट टॉप बॉक्स मोफत मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या