
सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क
ज्या व्यक्ती मोबाईलवर चॅटींग, शॉपिंग, गेमिंग, मेसेजेस करण्याबरोबरच गाणी ऐकण्यात बराच वेळ घालवतात त्या अनावश्यक खरेदी करतात. असे एका संशोधनात समोर आले आहे. मोबाईलच्या अतिवापराचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावरही होत असून खरेदी करण्याकडे अशा व्यक्तींचा कल जास्त असतो.
अमेरिकेच्या फेअरफिल्ड युनिव्हर्सिटीतील संशोधकांच्या टीमने केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. यासाठी दोन गट तयार करण्यात आले होते. एका गटात मोबाईलचा कमी वापर करणारे व दुसऱ्या गटात मोबाईलचा अतिवापर करणाऱ्या व्यक्तींचे हे गट होते. यावेळी दोन्ही गटातील व्यक्तींच्या जीवनावर मोबाईलचा परिणाम याचे निरिक्षण करण्यात आले. तेव्हा मोबाईलवर गाणी ऐकत खरेदी करणाऱ्या व्यक्ती नको त्या गोष्टींची खरेदी करत असल्याचे आढळले. त्या तुलनेत मोबाईलचा कमी वापर करणाऱ्या व्यक्ती गरजे पुरत्याच वस्तू खरेदी करत होत्या. असे संशोधकांनी सांगितले आहे.























































