
दादर-माटुंगा सांस्कृतिक पेंद्राचा 2024 सालचा गानसरस्वती पुरस्कार आग्रा घराण्याचे प्रतिथयश हिंदुस्थानी शास्त्रीय गायक कोलकात्याचे उस्ताद वसीम अहमद खान यांना जाहीर झाला. एक लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे वितरण 9 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे होईल.
उस्ताद वसीम अहमद खान हे उस्ताद आटा हुसेन खान, नसीम हुसेन खान आणि शफी अहमद खान यांचे शिष्य आहेत. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांनी हा पुरस्कार 2017 साली आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ सुरू केला. 50 वर्षे वयाखालील प्रथितयश हिंदुस्थानी गायक किंवा गायिकेला तो दिला जातो.