
उत्तर प्रदेशमध्ये बळजबरीने धर्मांतर केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर योगी सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, धर्मांतर प्रकरणात दोषी आढळल्यास रासुका (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) लावून संपत्ती जप्त करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. उत्तर प्रदेश अँटी टेरेरिस्ट स्क्वॉडने (एटीएस) सोमवारी दोन मौलाना जहांगीर आणि उमर गौतमला लखनौमधील एका मोठय़ा मुस्लिम संस्थेतून ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर बळजबरीने हिंदूंचे धर्मांतर केल्याचा आरोप आहे. एटीएसची टीम सुमारे चार दिवस त्यांची चौकशी करून पुरावे गोळा करत होती. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय त्यांना फंडिंग करत होती.

























































