स्त्रियांची छेड काढणाऱ्यांना यमसदनी धाडणार – योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशात कोणी स्त्रियांची छेड काढण्याचा प्रयत्न केल्यास त्याला पोलीस तत्काळ यमसदनी धाडतील, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. याआधी राज्यात महिला सुरक्षित नव्हत्या. खून, मारामाऱया, दरोडे राजरोसपणे होत होते; पण आता पोलिसांच्या भीतीने हे सगळे थांबले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कानपूर येथील व्हीव्हीएसडी कॉलेजमधील एका संमेलनात बोलत होते.