अखिलेश यादव यांना आणखी एक झटका, पराभवानंतर महत्व घटणार

78
akhilesh-yadav

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची ‘झेड प्लस’ सुरक्षा लवकरच काढून घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे. राज्य सरकारने तशी तयारी केली असून सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित कागदपत्रांवर सही केल्याचेही आजतकच्या वृत्तात म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचे गठबंधन पराभूत झाल्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. दुसऱ्याबाजूला पराभवानंतर गठबंधन देखील तुटले आहे. या लोकसभेत बसपाला 10 तर सपाला 5 जागा जिंकता आल्या आहेत.

याआधी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कमी करण्यात आली आहे. त्यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, मात्र आता कमी करून ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

दरम्यान, बसपा अध्यक्ष मायावती आणि सपाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांना एनएसजी सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या