
उत्तर प्रदेशात एक अनोखे प्रकरण समोरक आले आहे. तीन वर्षांपासून पत्नीशी भांडून घर सोडून गेलेल्या पतीने पत्नी समोर ठेवली शर्थ. आता पत्नीने पतीला घरी आणण्यासाठी पोलिसांकडे विनंती अर्ज दाखल केला आहे, तिला सात मुली असल्याने ती पतीला घरी बोलावत आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
सुरीर येथील बदनपुर निवासी नसरीन यांनी बुधवारी तीन वर्षापूर्वी पतीविरोधात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस ठाण्यात विनंती अर्ज केला आहे. तीन वर्षापूर्वी पतीसोबत भांडण झाले होते. त्यामुळे संतापलेल्या नसरीनने पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पती नाराज होऊन घर सोडून निघून गेला होता. आता तो तीन वर्षाने पुन्हा घरी परतला आहे. आता तिला कुठूनतरी तिच्या पतीचा नंबर मिळाला. तिने त्याला फोन लावला आणि त्याच्याविरोधात केलेली तक्रार मागे घेण्यास सांगितली. तसे केल्यानंतरच तो घरी परतणार असे सांगितले. अनेकदा विचारुनही पतीने त्याचा ठावठिकाणा सांगितला नाही.
महिलेच्या म्हणण्यांनुसार, तिला सात मुली आहेत. ज्यामध्ये तिने पतीच्या अनुपस्थितीत दोन मुंलीची लग्नही लावली. तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या पतीला घरी बोलावण्यासाठी ती त्याची वाटेल ती अट मान्य करायला तयार आहे. महिलेने बुधवारी सुरीर येथील पोलीस स्थानकात ती तक्रार मागे घेण्यासाठी निवंती अर्ज केला आहे. एसएसआय अमित कुमार यांच्या म्हणण्यांनुसार, एक महिला आपल्या पतीविरोधात केस मागे घेम्यासाठी आली होती. मात्र तिने केस कधी आणि काय केली होती त्याचा तपास सुरु आङे.