मावशीच्या नवऱ्यासोबत होते अनैतिक संबंध त्यातून पुढे घडला भयंकर प्रकार

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एका व्यक्तीने त्याच्या 22 वर्षीय भाचीची हत्या केली. हत्येनंतर पकडले जाऊ नये व पोलिसांची दिशाभूल व्हावी यासाठी मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ व्हिलेवाट लावून तिचा मोबाईल चालत्या बसमध्ये फेकून दिला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी पांडे असे या मृत तरूणीचे नाव होते. मानसी रक्षाबंधनीनिमित्त सोमवारी तिच्या मावशीच्या घरी गेली होती. तिथून परत घरी ती आली नाही. त्यामुळे मानसी वडिल रामसागर यांनी मणिकांत द्विवेदीवर मुलीला पळवून नेल्याचा आरोप करत पोलिसांत गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी मणिकांतला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. आरोपीने चौकशीदरम्यान त्याच्या आणि मानसीच्या प्रेमसंबंधाबद्दल सांगितले. मात्र मानसीला आता वेगळ्या व्यक्तीशी लग्न करायचे होते. यामुळे मणिकांतने रागा आला आणि त्याने मानसीचा गळा दाबून तिचा खून केल्याचे त्याने पोलिसांकडे कबूल केले.

मानसीचे वडील रामसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास त्यांनी मानसीला मणिकांतच्या घरी सोडले होते, त्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी लखनऊ येथे गेले. बुधवारी मणिकांतने रामसागर यांना फोन करून मानसी बेपत्ता असून तिचा फोन बंद असल्याचे सांगितले. मात्र रामसागर यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मणिकांतने मृतदेहाची बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ विल्हेवाट लावली आणि तिचा मोबाईल चालत्या बसमध्ये फेकून दिला होता. मानसीचा मृतदेह इमारत परिसरातून बाहेर काढण्यात आला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

मानसी आणि मावशीचा नवरा मणिकांत पांडे यांचे दोन वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. मात्र मानसीच्या वडिलांनी तिचे लग्न 27 नोव्हेंबरला ठरवले होते. तिला देखील ते लग्न करण्याची इच्छा होती.