आधी रक्तदान, मग लग्न! वधू-वराने वाचवला चिमुकलीचे प्राण

सोशल मीडियात सध्या उत्तर प्रदेशातील एका जोडप्याचा फोटो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. या जोडप्याने चक्क लग्न मंडपातून उठून रक्तदान करत एका चिमुकलीचा जीव वाचवला आहे. त्यांनी दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून काैतुक होतेय.

पोलीस शिपाई आशीष मिश्रा यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत या जोडप्याचे काैतुक केले आहे. त्यांनी या जोडप्याचा रक्तदान करतानाचा लग्नाच्या कपडय़ांमधील फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये नवरदेव रक्तदान करताना दिसतेय. तर, त्याच्या शेजारी नवरी उभी असलेली दिसतेय. कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलंय,‘एका लहान मुलीला रक्ताची गरज होती. कोणीही रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत नव्हतं. कारण, ती कोणा दुसऱयाची मुलगी होती. असो, लग्नाच्या दिवशी या जोडप्याने रक्तदान करुन एका चिमुकलीचा जीव वाचवला आहे.’ लोकांनीही या जोडप्याच्या कार्याला सलाम करत ‘ग्रेट वर्प’ अशा कमेंट देऊन काैतुक केले आहे, तसेच त्यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या