
उत्तरकाशीतील धराली गाव आणि सुखी टॉप येथे मंगळवारी ढगफुटी झाली. ढगफुटीनंतर आलेल्या पुरामुळे अनेक घरं, इमारती वाहून गेल्या. या पुरात अनेक जण बेपत्ता झाले आहेत. उत्तराखंडला फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 51 पर्यटकांचा मंगळवारपासून संपर्क तुटला होता. मात्र हे सर्व पर्यटक सुखरुप असल्याची माहिती बुधवारी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील 11, सोलापूर जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यांतील 36 असे एकूण 51 पर्यटक सुखरुप आहेत. उत्तराखंडला फिरायला गेलेल्या सोलापूरातील चौघांपैकी एकाने फोन करून आपण बेस कॅम्पमध्ये सुखरुप असल्याची माहिती दिली. उत्तराखंडमधील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर चौघेही सोलापूरला परतील.
अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक मदत पोहचवण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी राज्य शासन दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्राशी संपर्क साधत आहे. अडकलेल्या पर्यटकांना मदत पुरवण्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र : 9321587143 / 022-22027990 / 022-22794229
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड : 0135-2710334 / 821