कोरोना पॉझिटिव्ह नसताना मृतदेहाला खांदा देण्यासाठी जवळच्यांनी फिरवली पाठ; उत्तरप्रदेमधील हृदयद्रावक घटना

उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ मध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे भीतीचे वातावरण परसले आहे. कोराना संसर्गाच्या भीतीने 13 वर्षाच्या मूलाच्या मृतदेहाला खांदा देण्यासाठी कोणीही पुढे सरसावले नाही. मृत मुलाच्या वडिलांनी नाईलाजास्तव मुलाच्या मृतदेहाला नाल्याजवळ खड्डा खोदून दफन केले. 13 वर्षीय मुलाचा कोरोनाने मृत्यू झाला नव्हता. कोरोनाच्या भीतीने माणसातील संवेदनशीलता कमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लखनौ मध्ये कोरोना संसर्गामुळे मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच एका वडिलाला आपल्या 13 वर्षीय मृत मुलाला दफन करण्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लखनौच्या चिनहाट पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात राहणाऱ्या सुरजपाल यांच्या 13 वर्षीय मुलाला एका आठवड्यापासून जोराचा ताप होता. सुरजपाल आपल्या मुलाचा घरीच इलाज करत होते. दिवसेंदिवस मुलाची तब्येत खराब होऊ लागली होती, त्यामुळे मुलाचा मृत्यू झाला. मृतदेहाला खांदा देण्यासाठी आजुबाजूच्या शेजाऱ्यांना मुलाच्या वडीलांनी आवाज दिला, पण मृतदेहाला खांदा देण्यासाठी कोणीही पुढे सरसावले नाही. कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी नातेवाईकांनी सुद्धा पाठ फिरवली.

अशा परिस्थितीत मुलाच्या वडिलांनी मृतदेहाला खांद्यावर घेत चिनहटच्या लौलाई उपकेंद्राजवळ असलेल्या नाल्यालगत मृतदेहाला दफन केले. वडिलांची रडून-रडून अवस्था खराब झाली होती. लोकांमध्ये कोरोनाचे एवढे भय आहे की, माझ्या मुलाला कोरोनाची लागण नसताना त्याला खांदा द्यायला कोणी समोर आले नाही.

मृतमुलाचे वडील सुरजपाल यांनी सांगितले की, मुलाचा मृत्यू ताप आल्याने झाला. लोकांना मुलाच्या मृतदेहाला खांदा देण्यासाठी मदत मागितली, परंतू कोरोनाच्या भीतीपोटी मदतीसाठी कोणीही पुढे सरसावले नाही. लोकांनी उलट आम्ही गृहविलगीकरणात आहोत अशी कारणे सांगितली. नातेवाईकांनी लॉकडाऊनचे कारण सांगत पाठ फिरवली. मृत मुलाच्या वडीलांनी काही तासातच स्व:त मृतदेहा खांद्यावर घेत नाल्याजवळील जागेत दफन केले. माझ्या मुलाला कोरोनाची लागण झाली नव्हती असे वडिलांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या