
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री वाणी कपूरने फवाद खानसोबतच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाशी संबंधित सर्व पोस्ट इन्स्टाग्रामवरून हटवल्या आहेत. ‘अबीर गुलाल’ वर हिंदुस्थानात बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी कलाकारांचे अकाऊंट्सही ब्लॉक करण्यात आले आहेत. अशातच वाणी कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. वाणीच्या सोशल मीडिया अकाऊंट व्यतिरिक्त चित्रपटातील गाणी आणि प्रमोशनल कंटेट यूट्यूबवरून हटवण्यात आले आहेत.
































































