वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद, मुंबईत बेस्ट बसची तोडफोड

528

नागरिकत्क संशोधन कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्क नोंदणी (एनआरसी) विरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हा बंद यशस्वी झाल्याचे सांगत शुक्रवारी सायंकाळी ‘महाराष्ट्र बंद’ मागे घेतला. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान 3 हजारांपेक्षा अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

– कुर्ला रेल्वे स्थानकावरून चेंबूरकडे जाणाऱया 362 क्रमांकाच्या बसवर आंदोलकांनी दगडफेक केली. पवईमध्येदेखील जोगेश्वरी-अंधेरी लिंक रोडकर आंदोलकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. मुलुंड, विक्रोळी, सायन आणि घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकरनगरमध्ये दुकाने बंद करण्यात आली.

– पुण्यात या आंदोलनादरम्यान हिंसक वळणही लागले. यामध्ये दत्तवाडी आणि कोथरूड परिसरात वाहनांवर दगडफेक करण्यात आली. इंदापूर व बारामतीत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच बाजारपेठा बंद होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या