पत्नीचे विवाहबाह्य संबंध, व्हिडीओ बनवून पतीने उचलले टोकाचे पाऊल

बंगळुरुचा एआय इंजिनीअर अतुल सुभाष याने पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले होते. आता असाच काहीसा प्रकार वाराणसीमध्ये घडला आहे. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पतीने टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्येपूर्वी त्याने 7 मिनिटांचा व्हिडीओ बनवून आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. शिवाय  भाजप सरकारला अन्याय फक्त मुलींवरच होतो का, मुलांवर होत नाही का? असा सवाल केला. पत्नीने 498 चा गैरवापर करत आरोप केल्याने मी  जीवन संपवत आहे, असे म्हटले आहे. त्यानंतर तरुणाच्या पत्नीसह सासूला अटक करण्यात आली आहे.

राहुल मिश्रा असे त्या तरुणाचे नाव असून त्याने घरातच गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपासणी दरम्यान राहुलचा मोबाईल ताब्यात घेतला. मोबाईलची तपासणी केली असता त्याच्या मोबाईलमध्ये 7 मिनिटं 29 सेकंदाचा एक व्हिडीओ मिळाला. त्यात त्याने म्हटले आहे की, मी बायकोवर जीवापाड प्रेम केले. पण तिला दुसरा कोणी आवडतो. भाजप सरकारला मी विचारू इच्छितो की फक्त मुलींवरच अन्याय होतो का? मुलांवर अन्याय होत नाही का? 498 कलमामुळे मी माझे जीवन संपवत आहे, असे म्हणत आहे. व्हिडीओत राहुलने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप करत तिचा प्रियकर शुभमचे नाव घेतले आहे.

या व्हिडीओत राहुल म्हणाला की, माझ्या पत्नीवर माझे खूप प्रेम आहे. तिने शुभम सिंहशी बोललेले मला आवडत नाही. त्याचे ऐकून तिने माझ्यावर अनेक कलमं लावली आहेत. पोलीस ठाणे आणि न्यायालयाच्या पायऱ्या चढून कंटाळलो आहे. एवढेच नाही तर पत्नी माझ्या मुलालाही भेटायला देत नाही. त्यामुळे मी प्रचंड त्रस्त झालो आहे. मला माहित आहे की तो माझ्या पत्नीला ओयोला घेऊन जाईल. हे असह्य आहे. मी ज्या पत्नीवर खूप प्रेम केले ती दुसऱ्या पुरुषासोबत राहण्याचा आग्रह धरत आहे. मरण्यापूर्वी राहुलने संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये सांगितली. त्याची पत्नी आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी दोघींनाही अटक केली.

मृत्युपूर्वी राहुलने कलम 498 (हुंडा विरोधी कायदा) चा गैरवापर आत्महत्येचे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले. त्याने भाजप सरकारला प्रश्न विचारला की 2014पा सून अशी मानसिकता का निर्माण झाली आहे की फक्त मुलेच दोषी आहेत आणि मुली दोषी नाहीत. मृत्युपूर्वी राहुलने सरकारला कलम 498 मध्ये सुधारणा करण्याची विनंती केली. राहुलच्या आईने आत्महत्येसाठी पत्नी आणि सासूला जबाबदार धरले आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी राहुलची पत्नी आणि सासूला अटक केली आहे.