वारकर्‍यांच्या बसचा आंबेनळी घाटात भीषण अपघात,19 भाविक जखमी

750

पंढरपूरहून परतणार्‍या वारकर्‍यांच्या बसला आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला. यात 19 भाविक जखमी झाले असून पाचजणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीने मुंबई येथे हलविण्यात आले आहे. चालकाला डुलकी लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रवाशांनी सांगितले.

खेड तालुक्यामधील दिकाण खकटी गावातील 19 वारकरी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथून श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतत होते. शनिवारी पहाटे पोलादपूर-महाबळेश्कर-काई-सुरूर या मार्गाकरून आंबेनळी घाटातून त्यांची मिनीबस (क्र.एमएच 04 एफएक्स 1632) येत होती. त्यावेळी आड कुंभळवणे गावादरम्यान तीव्र वळणाकर चालकाला डुलकी लागल्याने त्याचा ताबा सुटला आणि भरधाव बस आंब्याच्या झाडावर जाऊन धडकली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 19 भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी सहदेव साळवी, पार्वती साळवी, शांता साळवी, प्रतिभा कदम आणि ड्रायव्हर नितेश सावंत यांना गंभीर दुखापत झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या