कूली नंबर वनचा ट्रेलर  सोशल मीडियावर ट्रोल, डिसलाईक लपवण्याची वेळ

वरुण धवन आणि सारा अली खानचा कूली नंबर वनचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च झाला आहे. पण प्रेक्षकांना हा ट्रेलर आवडला नसून त्यांनी वरून धवनला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. इतकेच नाहीतर ऍमेझॉन प्राईमला आपला युट्युबवरील ट्रेलरवरील लाईक डिसलाईक लपवण्याची वेळ आली आहे.

डिसलाईक लपवले

डेव्हिड धवन यांनी आपल्याच चित्रपटाचा रिमेक कूली नंबर वनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला पसंती मिळण्या ऐवजी प्रेक्षकांनी ट्रोल केले आहे. वरुण धवनची ओव्हर ऍक्टिंग असल्याची प्रतिक्रिया देत सारा अली खानलाही नेटकर्‍यांनी ट्रोल केले आहे.

सोशल मीडियावर हा ट्रेलर ट्रोल झाल्यानंतर ऍमेझॉनने या व्हिडीओवरील लाईक आणि डिसलाईक लपवले आहेत. असे असले तरी प्रेक्षकांनी कमेट सेक्शनमधून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

फेसबुकवर हा हा रिऍक्ट्स

फेसबुकवर कूली नंबर वनचा ट्रेलर स्पॉन्सर करण्यात आला होता, तरी या व्हिडीओला अवघे 35 हजार रीऍक्शन आले. त्यातही सात हजारहून अधिक हा हा रीऍक्ट्स आले आहेत.

जुन्या कूली नंबर वनची आठवण

नवीन कूली नंबर वनचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने नेटकर्‍यांनी गोविंदाच्या कूली नंबर वनच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. तसेच जुडवा नंतर अजून एका चित्रपटाचा रीमेक करून जुन्या चित्रपटाची वाट लावल्याबद्दल नेटकर्‍यांनी ट्रोल केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या