वरुण धवन चढणार बोहल्यावर, गोव्याच्या समुद्रकिनारी पार पडणार शाही विवाहसोहळा

1690

अभिनेता वरुण धवन व त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. वरुण व नताशाच्या लग्नाबाबतही अनेकदा बातम्या आल्या. मात्र यावर्षी वरुण नक्कीच बोहल्यावर चढणार असल्याचे समजते. येत्या मे महिन्यात वरुण व नताशा लग्नबंधनात अडकणार आहेत.


View this post on Instagram

Let there be snow ☃️wishing everyone out there a very happy new year 2020

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे एक शाही पण देसी स्टाईल विवाहसोहळा प्लान करत आहेत. लग्नासाठी त्यांनी गोवा हे ठिकाण निवडलं असून तिथे ग्रँड समर वेडिंग करणार आहेत. गोव्यातील लक्झरियस बीच रिसॉर्टवर ते लग्न करणार आहेत. य़ा लग्नसोहळ्याला संपूर्ण बॉलिवूडला आमंत्रण असणार असून लग्नापाठोपाठ मुंबईत ग्रँड रिसेप्शन देखील असणार आहे.

वरुण हा सध्या त्याच्या स्ट्रिट डान्सर या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर दिसणार आहे. हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला रिलीज होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या