वसई-विरारमधील कोरोनाबाधितांची संख्या 29 वर; तिघांचा मृत्यू

468

वसई विरार शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत गुरूवारी एका रुग्णाची वाढ झाली आहे. त्यामुळे आता वसई- विरारमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29 वर पोहचली आहे. आतापर्यंत पालिका क्षेत्रात 29 कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

नालासोपारा पूर्वेला 35 वर्षीय कोरोनाबाधीत तरुण आढळल्यानंतर त्याला उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महापालिका हद्दीत 26 रुग्ण तर ग्रामीण परिसरात 3 असे एकूण 29 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर या रूग्णांपैकी 3 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधीत रूग्ण आढळलेले परिसर महापालिकेतर्फे सील करण्यात आले असून परिसर निर्जंतुक करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या