वाशीममध्ये खरीप हंगामाला बसला फटका

386

 वाशीम जिल्ह्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. या पावसामुळे जिह्यातील शिरपूर, एरंडा, भोयता, बोराळा या भागातील नदीनाल्यांना पूर आला आहे. तर या पावसामुळे जिह्यातील अनेक ठिकाणच्या शेती पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्यामुळे खरीप हंगामात फटका बसला आहे.

मालेगाव तालुक्यातील शिरपूर इथल्या नाल्याला पूर आल्याने वाघी, खंडाळा, गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच शिरपूर-करंजी रस्त्यावरील शिरपूरनजीकच्या नाल्याला पूर आल्याने शिवारातील शेतकरी दोन्ही बाजूला अडपून पडलेत. एरंडा, भोयता, बोराळा येथे मुसळधार झालेल्या पावसामुळो नदी, नाले भरून वाहत आहेत. या पावसामुळे काही जणांचे पेरलेले बियाणे वाहून गेल्याचेही चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या