अभ्यासाची ‘दिशा’ महत्त्वाची, वाचा काय म्हणते वास्तुशास्त्र

3993

लॉकडाऊनमध्ये नोकरदारांना वर्क फ्रॉम होम तर विद्यार्थ्यांना घरातूनच ऑनलाईन अभ्यास करायचा आहे. लॉकडाऊनमुळे आधीच घरात बसून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना सुट्टीत अभ्यास करायचा पण कंटाळा आलाय. मग पालकही मुलांच्या मागे अभ्यासाचा तगादा लावतात. काहीवेळा मुले पालकांचे ऐकतात. तर काही वेळा दुर्लक्ष करतात. मात्र वास्तुशास्त्रातील खाली दिलेल्या काही टीप्स फॉलो केल्या तर मुलांच्या अभ्यासातील बऱ्याच अडचणी दुरू होऊ शकतात. अकोला येथील वास्तुशास्त्रज्ञ संजय पाटील यांनी याविषयी माहिती दिली.

घरातील अभ्यासाची जागा
वास्तुशास्त्रात दिशेला फार महत्त्व आहे. दिशा योग्य असेल तर कार्यात कोणतीही अडचण येणार नाही. घरातील अभ्यासाची जागा म्हणजे ईशान्य दिशा. घरातील उत्तर-पूर्व दिशेकडील जागेमध्ये अभ्यासाचे ठिकाण असायला हवे. ही स्पष्टतेची दिशा असून या जागेवरून केलेले कोणतेही काम चांगलेच होते.

हिरव्या रंगाचे महत्त्व
अभ्यासासाठी अधिक चांगले वातावरण राखायचे असेल तर हिरवा रंग महत्त्वाची भूमिका बजावेल. स्टडी टेबल, अभ्यासाच्या खोलीत हिरव्या रंगाच्या वस्तू असणे आवश्यक आहे. अभ्यासाच्या खोलीला हिरवा रंग दिला असेल तर अधिक उत्तमच.

पालकांची बेडरूम
पालकांचा बेडरूम नैऋत्य दिशेला असेल तर या पालकांचा आपल्या मुलांवर वचक असतो. पालकांनी केलेल्या सूचनांचे ही मुले पालन करतात.

हेदेखील महत्त्वाचे
– मुलांची अभ्यास करण्याची जागा हवेशीर असावी.
– पुरेसा सूर्यप्रकाश असावा.
– वह्या पुस्तके व्यवस्थित ठेवलेली असावीत.
– अभ्यास करताना दरवाजाकडे मुलांची पाठ होणार नाही हे पहावे.

सरस्वती, सूर्यदेवाचे चित्र लावणे हे लाभदायक
वास्तुशास्त्रात सर्वाधिक महत्त्व दिशेला असले तरी अभ्यासाच्या खोलीत किंवा स्टडीटेबलच्या ठिकाणी सरस्वती देवी आणि सूर्यदेवाचा फोटो लावणे लाभदायक ठरेल. तसेच अभ्यास करताना मुलांचे तोंड हे पूर्व दिशेला असायला हवे कारण ही दिशा उगवत्या सूर्याची असून या दिशेला तोंड करून बसल्यास अभ्यास करताना ऊर्जा प्राप्त होते.

आपली प्रतिक्रिया द्या