‘वासुकी’ सापाचे अवशेष आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

 

सर्वात लांब सापाचे अवशेष गुजरातमधील कच्छ जिह्यात सापडले आहेत. वासुकी इंडिकस असे या सापाच्या प्रजातीचे नाव आहे. याचा शोध आयआयटी-रुरकी येथील शास्त्रज्ञांनी लावला होता. संशोधकांना सापाच्या पाठीच्या 27 हाडांचा शोध लागला आहे. हा संशोधन अहवाल नुकताच ‘सायंटिफिक रिपोर्टस्’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. वासुकी नागाची लांबी 11 ते 15 मीटर म्हणजेच 50 फूट आणि त्याचे वजन एक टन एवढे असते.