वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱया नीट परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने 4 जून रोजी निकाल जाहीर केला, परंतु 4 जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी असल्याने या निकालाकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही. या वर्षी नीट यूजीमध्ये एकूण 67 विद्यार्थ्यांनी एअर वन रँक मिळवली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना 720 गुण आणि 99.99 पर्सेंटाईल मिळाले आहेत. तसेच 13.16 लाख मुलांनी नीटची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. जनरल पॅटेगरीतून महाराष्ट्राचा वेद सुनीलकुमार शेंडे हा विद्यार्थी टॉपवर आहे. दुसऱया नंबरवर तामीळनाडूचा सैयद आरिफिन युसूफ एम, तिसऱया नंबरवर दिल्लीचा मृदुल मान्या आनंद आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने नीट निकालाची सूचना ‘एक्स’वर दिली. या वर्षी जवळपास 24 लाख मुलांनी नीटची परीक्षा दिली होती.
नीटची परीक्षा 5 मे रोजी देशातील 557 शहरांत आणि 14 राज्यांत घेण्यात आली होती. 24 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात एकूण 9लाख 96 हजार 393 मुले तर 13 लाख 31 हजार 321 मुलींचा यात समावेश होता.
पहिल्या रँकमधील टॉप 10 विद्यार्थी
वेद सुनीलकुमार शेंडे
सैयद आरिफिन युसूफ एम
मृदुल मान्या आनंद
आयुष नौगरैया
मजिन मन्सूर
रूपायन मंडल
अक्षत पंगरिया
शौर्य गोयल
तथागत अवतार
चाँद मलिक
14 मुलींना पहिली रँक
या वर्षी नीट परीक्षेत एकूण 14 मुलींनी नीट परीक्षेत पहिली रँक मिळवली आहे, तर 53 मुलांनी पहिली रँक मिळवली आहे.
56.4 टक्के विद्यार्थी पास
यावर्षी नीट यूजीसीसाठी 24 लाखांहून जास्त विद्यार्थ्यांनी नीटसाठी नोंदणी केली होती. यातील 23 लाख 33 हजार 297 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, परंतु 13 लाखांहून अधिक म्हणजेच 56.4 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.
जनरल पॅटेगरीतील 3,33,932, ईडब्ल्यूएससाठी 1,16,229, ओबीसी वर्गातील 6,18,890, एससी वर्गातील 1,78,738, एसटी वर्गातील 68,479 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
क्वॉलिफाइंग गुणांत वाढ
या वर्षी नीट परीक्षेत क्वॉलिफाइंग गुणांत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जनरल पॅटेगरीसाठी क्वॉलिफाइंग गुणांची रेंज 720 ते 137 होती, परंतु या वर्षी ती वाढून 720 ते 164 झाली आहे. गेल्या वर्षी ओबीसी, एससी आणि एसटी गटासाठी
क्वॉलिफाइंग गुणांची रेंज 136 ते 107 होती. ती आता वाढून 163 ते 129 झाली आहे.
महाराष्ट्रातील टॉपर
निकालात महाराष्ट्र तिसऱया नंबरवर आहे. वेद शेंडे, शुभन सेनगुप्ता, उमायमा मालबारी, मलांशा अग्रवाल, कृष्णमूर्ती पंकज शिवाल हे टॉपर आहेत.
राज्यनिहाय निकाल
उत्तर प्रदेश
165047
राजस्थान
121240
महाराष्ट्र
142665
कर्नाटक
89088
केरळ
86681
बिहार
74743
तामीळनाडू
89426
पश्चिम बंगाल
63135