महागाईचा आगडोंब! शाकाहारी थाळी महागली

महागाईने जेवणाच्या थाळीच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. क्रिंसिलच्या अहवालानुसार, जुलै महिन्यात शाकाहारी थाळीची किंमत 11 टक्क्यांनी वाढली तर मांसाहारी थाळीची किंमत 6 टक्क्यांनी वाढली. जुलै महिन्यात घरच्या शाकाहारी थाळीचा खर्च 4 टक्क्यांनी कमी झाला तर घरच्या मांसाहारी थाळीच्या खर्चात 9 टक्के घसरण झाली.

वर्षा-दरवर्षामध्ये भाजीच्या थाळीची किंमत कमी होण्याचे कारण म्हणजे टोमॅटोच्या किमती 40 टक्क्यांनी कमी झाल्या. जुलै 2023 मध्ये टोमॅटोचा दर 110 रुपये प्रतिकिलो होता. गेल्या वर्षी अचानक किमती वाढण्याचे कारण म्हणजे महापूर. महापुरामुळे उत्तरेकडील राज्ये प्रभावित झाली होती. कर्नाटकमध्येही पिकांचे मोठे नुकसान झाले होते. कांदा-बटाट्याच्या किमती आवक घटल्याने अनुक्रमे 65 आणि 55 टक्के वाढल्या होत्या.

टोमॅटोचा फटका

व्हेज थाळीचे दर 11 टक्क्यांनी वाढले. त्यातील 7 टक्के वाढ ही टोमॅटोच्या किमती वाढल्याने झालेली आहे. टोमॅटोच्या किमतीत या वर्षी 55 टक्क्यांची वाढ झालेय. जून महिन्यात टोमॅटो 42 रुपये किलो होते. जुलैमध्ये टोमॅटो 66 रुपये झाले. उच्च तापमानामुळे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात पिकांचे नुकसान झाले.

नॉन व्हेज थाळी आवाक्यात

नॉन व्हेज थाळीचे दर कमी झाले. कारण ब्रॉयलर चिकनच्या किमती 11 टक्क्यांनी खाली आल्या. त्यामुळे व्हेज थाळीच्या तुलनेत नॉन व्हेज थाळी आवाक्यात राहिली.