हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा! व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींचे ट्रम्प यांना आव्हान

व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा, असे मादुरो यांनी म्हटले आहे.

अमेरिकेने मादुरो यांना ड्रग तस्कर म्हणून घोषित केले आहे. एका ड्रग टोळीशी संधान साधून ते अमेरिकेत फेंटानाइल मिश्रित कोकेन सप्लाय करत आहेत. त्यांच्याकडे 7 टन कोकेन असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. त्यामुळेच अमेरिकेने त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांची 700 मिलियन डॉलर इतकी संपत्ती अमेरिकेने जप्त केली आहे. त्यात दोन खासगी जेट्सचाही समावेश आहे.

…तर अमेरिकी साम्राज्याचा शेवट

मादुरो यांनी हे सर्व आरोप फेटाळात ट्रम्प यांनाच आव्हान दिले आहे. अमेरिकेने आमच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करू नये. त्यांनी काही आगळीक केल्यास असे उत्तर मिळेल की त्यातून अमेरिकी साम्राज्याचा शेवटही होऊ शकतो, असे मादुरो यांनी ठणकावले आहे. ‘मला अटक करायचे स्वप्न बघताय? मी इथेच राष्ट्रपती भवनात तुमची वाट बघतोय. भेकडांनो या. उशीर करू नका’, असंही मादुरो म्हणाले.