ती परत येतेय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेली दोन वर्षे जवळजवळ टेनिस विश्वापासून दूर असलेली 7 ग्रॅण्डस्लॅम जिंकणारी तसेच 5 वेळा विम्बल्डनच्या महिला एकेरीचे जेतेपद पटकावणारी, आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 49 जेतेपदे जिंकणारी 43 वर्षीय व्हीनस विल्यम्स पुन्हा एकदा विम्बल्डनच्या हिरवळीवर लढण्यासाठी सज्ज झाली आहे. आपल्या 26 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिने 24व्यांदा विम्बल्डनमध्ये सहभागी होण्यासाठी महिला एकेरीत वाइल्ड कार्ड एण्ट्रीद्वारे स्थान मिळविले आहे. ही तिची या वर्षीची पहिलीच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा असेल.

व्हीनसने 2017 साली विम्बल्डनच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती; पण तिला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. गेली दोन वर्षे ती टेनिसपासून दूर होती. पण आता 697वे मानांकन मिळवत तिने नुकत्याच बार्ंमगहॅम क्लासिकमध्ये 48व्या मानांकित कॅमिला जिऑर्गीचा कडव्या संघर्षानंतर पराभव केला आणि तब्बल चार वर्षांनंतर अव्वल 50 मध्ये असलेल्या खेळाडूला नमविले. गेल्या सहा वर्षांत व्हीनसला एकाही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीतही मजल मारता आलेली नाही. येत्या 3 जुलैपासून विम्बल्डनचा थरार रंगणार आहे.