विकी कौशलला झाली ‘भूत’बाधा! पाहा व्हिडीओ

843

अभिनेता विकी कौशल सध्या चांगलाच चर्चेत आहे. मसानपासून सुरू झालेला त्याचा अभिनयाचा प्रवास उरी- द सर्जिकल स्ट्राईकपर्यंत चढत्या क्रमाचा राहिला आहे. यंदा त्याचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पण, त्याआधीच त्याला ‘भूत’बाधा झाली आहे.

थांबा घाबरू नका… ही भूतबाधा म्हणजे त्याचाच आगामी चित्रपट ‘भूत: पार्ट वन- द हॉन्टेड शिप’ आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये एका समुद्रात काळोख्या रात्री उभ्या असलेल्या एका एकाकी बोटीवर विकी फिरताना दिसत आहे. बोटीच्या आतल्या भागांमधल्या भिंतींवर रक्ताने माखलेले हातांचे असंख्य ठसे दिसत आहेत. टीझर चांगलाच भीतीदायक वाटतोय. सोमवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर पुढचं चित्र स्पष्ट होईल.

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली असून या चित्रपटात विकीसह भूमी पेडणेकरही झळकणार आहे. चित्रपटाची कथा अद्याप गुलदस्त्यात आहे. शशांक खेतान दिग्दर्शित ‘भूत: पार्ट वन- द हॉन्टेड शिप’ हा चित्रपट येत्या 21 फेब्रुवारी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा व्हिडी

आपली प्रतिक्रिया द्या