उधम सिंह बायोपिकसाठी विकी कौशलने घटवले 13 किलो वजन!

1011

उरी द सर्जिकल स्ट्राइकमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या विकी कौशलने आगामी उधम सिंह या बायोपिकसाठी 13 किलोने वजन घटवले आहे. उरी द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटात त्याने मेजर विहान सिंह यांची भूमिका साकारली होती. त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसादही दिला होता. आता विकीचे भूत आणि सरदार उधम सिंह हे चित्रपट येणार आहेत. सरदार उधम सिंह यांच्या बायोपिकसाठी विकीने 13 किलोने वजन घटवले आहे. सोशल मिडीयावर नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये विकी सडपातळ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विविध भूमिकांच्या गरजेप्रमाणे शरीरयष्टीत बदल करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत विकीचाही समावेश होत आहे.

मार्च महिन्यात विकीने या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर निमार्त्यांनी त्याचा फर्स्ट लूक रिलीज केला होता. या चित्रपटात विकी सरदार उधम सिंह यांची भूमिका साकारणार आहे. त्या भूमिकेप्रमाणे विकीने केशरचना केली असून त्याप्रमाणे मिशाही ठेवल्या आहेत. सरदार उधम सिंह चित्रपटाप्रमाणे सॅम माणकेशा चित्रपटासाठीही विकी चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूकही रिलीज झाला आहे. या चित्रपटासाठी विकीने सॅम माणकेशा यांचा हुबेहुब लूक साकारला आहे. त्याने 26 जूनला त्याने हा लूक शेअर केला होता. त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या