सोनालीचा ‘विक्की वेलिंगकर’ येतोय

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मध्यवर्ती भूमिका असलेला आणि सौरभ वर्मा दिग्दर्शित ‘विक्की वेलिंगकर’ मराठी चित्रपट 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘वेळेचे पाऊल आणि ‘विक्की केलिंगकर’ची चाहूल, फक्त काळालाच कळते!’ अशा आशयाचे ‘विक्की वेलिंगकर’चे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

‘विक्की वेलिंगकर’ ही व्यक्तिरेखा म्हणजे एक घडय़ाळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढ घटनेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची ही कथा आहे, अशी माहिती दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी दिली. चित्रपटाची निर्मिती जीसिम्स, अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांनी केली आहे. चित्रपटाची निर्मिती जीसिम्स, लोकीज स्टुडीओ आणि डान्सिंग शिवा प्रॉडक्शन यांची आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या