
सामना ऑनलाईन । नागपूर
विदर्भाच्या जिगरबाज क्रिकेटपटूंनी सलग दुसऱया वर्षी रणजी करंडक विजेतेपदाचा बहुमान पटकावण्याची किमया साधली. विदर्भाच्या पोट्टय़ांनी अंतिम लढतीत सौराष्ट्राचे आव्हान 78 धावांनी संपुष्टात आणत रणजी करंडकावर आपल्या संघाचे नाव कोरले. यापूर्वी 2017-18 मध्येही बलाढय़ दिल्ली संघाला पराभूत करीत विदर्भाने रणजी करंडक पटकावला होता. त्याच विजयाची विदर्भाने या वर्षी पुनरावृत्ती केली आहे. विदर्भाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो आपल्या जादुई फिरकीने दोन डावांत सौराष्ट्राच्या 11 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवणारा फिरकीवीर आदित्य सरवटे. सरवटेने पहिल्या डावात 98 धावांत 6 तर दुसऱया डावात 59 धावांत 5 फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम केला. आपले रणजी जेतेपद सलग दुसऱयांदा राखण्याचा पराक्रम साकारणारा विदर्भ हा सहावा रणजी संघ ठरला आहे.























































