Video – काहीही! या ठिकाणी मिळतं चिकन तंदूरी आईस्क्रीम

फळांच्या फ्लेव्हरचे, केकचे, बिस्किटचे, मिठाईच्या फ्लेव्हरचे आईस्क्रिम आतापर्यंत आपण ऐकले असतील. पण तुम्ही कधी चिकन पासून तयार केलेल्या आईस्क्रिमविषयी ऐकलं आहे का? हो असं आईस्क्रिम मिळतं. तेही चक्क दुधाची क्रिम घालून आपल्या डोळ्यांदेखील बनवून देतात. चिकनचे तंदूरीसारखे भाजलेले बोनलेस तुकडे व सोबत स्वीट क्रिम घालून हे आईस्क्रिम तयार केलं जातं. आपलं सुदैवंच म्हणायचं की हे आईस्क्रिम अजून तरी हिंदुस्थानात मिळत नाही. मात्र जर तुम्हाला ते खायची इच्छा असेल तर तुम्हाला आपला सख्खा शेजारी असलेला देश श्रीलंकेचा दौरा करावा लागेल. सुक्रीत जैन या फूड ब्लॉगरने या चिकन तंदूरी आईस्क्रिमचा व्हिडीओ त्याच्या पेजवर शेअर केला आहे.