Video – सावरकरांबाबतच्या भूमिकेवर शिवसेना ठाम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

3875

नागपूर येथे सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी येथे चहापानानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला यांच्यासह कॅबिनेटमंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ, डॉ. नितीन राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

  • मुख्यमंत्री म्हणून प्रथमच नागपुरात आलो आहे. मुंबईतील अधिवेशन झाले, मुख्यमंत्री म्हणून नव्या सरकारची कारकीर्दीची सुरुवात उद्यापासून होत आहे. जनतेच्या पाठबळावर हे सरकार आले आहे. त्याच्या आशीर्वादाने जनतेच्या अशा आकांक्षा पूर्ण करेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • आम्ही राज्यकारभार आणि सरकार म्हणून ज्या काही आशा अपेक्षा जनतेच्या आमच्याकडून आहेत त्या पूर्ण करण्यासाठी समर्थ ठरू – उद्धव ठाकरे
  • सावरकरांबाबत आमची भावना होती ती आहे, कालही होती, आजही आहे, उद्याही तशीच राहिल, त्यात काही फरक पडणार नाही – उद्धव ठाकरे

  • ज्यावेळी आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवत होतो, तेव्हा मी बोललो होतो की मला शेतकऱ्याला कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करायचं आहे आणि त्या दिशेने आम्ही पावलं नक्कीच टाकत आहोत – उद्धव ठाकरे
  • परिस्थती हाताबाहेर गेल्यानंतर स्वतःला काहीच करता येत नसेल तर देशात गोंधळ उडवा, लोकांना सतत तणावाखाली ठेवा आणि आपला कारभार आटपून घ्या अशी भाजपाची निती देशभरात ठरली की काय अशी मला शंका येते – उद्धव ठाकरे
  • पहिल्यांदा CAB हा बिल पास केलेला आहे, हे घटनेला धरून आहे का याचा फैसला कोर्टात होऊ द्या आणि आम्ही जे प्रश्न विचारले होते त्यामध्ये स्पष्टता आल्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा असेल तो आम्ही घेऊ – उद्धव ठाकरे
  • एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला त्याचा अभिमानच, पण त्याच पक्षाने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार टाकला – उद्धव ठाकरे
  • छत्रपती शिवाजी स्मारक याबाबत कोणी घोटाळा केला असेल तर ते निंदाजनक आहे, जो कोणी जबाबदार असेल त्यावर कारवाई करू –  उद्धव ठाकरे
  • कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिली नाही. मेट्रोच्या आरे कार शेडमधील कामांना फक्त स्थगिती दिली आहे – उद्धव ठाकरे
आपली प्रतिक्रिया द्या